Tarun Bharat

हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

वृद्धांसह विद्यार्थ्यांनी घरांवर फडकविला तिरंगा

प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्र सरकारने अमृतमहोत्सवानिमित्त सलग तीन दिवस हर घर तिरंगा हे अभियान राबवित आहे. यासाठी जनजागृती करण्यात आली होती. त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून वृद्धांसह विद्यार्थ्यांनीही आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवून देशप्रेम दाखवून दिले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे होत आहेत. या अमृतमहोत्सवी सलग तीन दिवस घर तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी कार्यालयांवर ध्वजारोहण करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयीन ध्वज सकाळी 8 वाजता फडकवून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता उतरविण्यात आला. सलग तीन दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या अभियानामध्ये तब्बल 90 वर्षांच्या ज्ये÷ांनीही आपला सहभाग दर्शविला हे वैशिष्टय़ आहे. सकाळी विद्यार्थ्यांनीही मोठय़ा उत्साहाने या अभियानामध्ये भाग दर्शविला. विविध संस्थांनीही ध्वजारोहण करून देशप्रेम व्यक्त केले आहे. चिदंबरनगर, अनगोळ येथील 93 वर्षांच्या वृद्धा लक्ष्मीबाई राजाराम पांगम यांनी ध्वजारोहण करून देशप्रेम व्यक्त केले आहे. अशाप्रकारे अनेक वृद्धांनी देशाविषयीचे प्रेम दाखवून दिले. सलग तीन दिवस आता हे अभियान सुरू राहणार आहे.

Related Stories

आप्पाचीवाडी येथे कोरोना लसीकरण

Patil_p

गोगटे उड्डाणपुलावरील पथदीप केव्हा सुरू होणार?

Patil_p

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ. याळगी यांचा सत्कार

Patil_p

पोलीस उपअधीक्षक रवी नाईक यांना मुख्यमंत्री पदक

Patil_p

स्मार्ट सिटीची अनेक कामे अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

बिम्सच्या विकासासाठी उद्योजकांकडून देणग्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!