Tarun Bharat

देवगडमधील मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजन

देवगड / प्रतिनिधी

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रविवारी सकाळी देवगड पोलीस ठाण्याच्यावतीने पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी अडीच किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. तसेच चौदा वर्षावरील शालेय मुलांसाठी अडीच किलोमीटर मॅरेथॉन व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अडीच किलोमीटर चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. सदरच्या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन व विद्यालयीन मुले, नागरिक , व्यापारी, शिक्षक , पोलीस, होमगार्ड, सागर सुरक्षारक्षक दलाचे सदस्य , एमटीडीसी कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन देवगड जामसांडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे उपस्थित होते सदर मॅरेथॉनच्या दरम्याने सर्व उपस्थितांना हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.

Related Stories

दापोली कृषी विद्यापीठाचे रँकिंग घसरले!

Archana Banage

गावकर परिषदेसाठी साडेबहात्तर खेड्यातील गावकरी पहिल्यांदाच आले एकत्र

Archana Banage

गुरांची अवैध वाहतूक रोखली

Patil_p

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

NIKHIL_N

जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

सावंतवाडी नगराध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N