Tarun Bharat

महिला आघाडीतर्फे आयोजित महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे आयोजित महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ सोमवार दि. २३ रोजी महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

शहरातील मराठा बँकेच्या सभागृहामध्ये महिला आघाडीचे अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली या महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वैशाली भातकांडे आणि माजी उपमहापौर रेणू मुतकेकर यांच्यासह महिला आघाडीच्या सरचिटणीस माजी महापौर सरिता पाटील व उपाध्यक्षा माजी नगरसेविका सुधा भातकांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रारंभी अर्चना देसाई व ग्रुपने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्याद्वारे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

सदर समारंभाला प्रारंभ होण्यापूर्वी महिला आघाडीतर्फे सभागृहात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी ग्रुप गेममध्ये प्रथम आलेल्या शिवानी रजपूत ग्रुप आणि पैठणी गेममध्ये प्रथम आलेल्या भारतीय जुवेकर यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक बक्षीसं देऊन गौरवण्यात आले.

Related Stories

वळिवाने माळरानावरील कामांना सुरुवात

Patil_p

बळिराजाच्या नुकसानाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष

Amit Kulkarni

बेळगावमध्ये 19 डिसेंबरपासून विधिमंडळ अधिवेशन

Amit Kulkarni

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग गरजेचा

Omkar B

आजपासून शाळा गजबजणार

Patil_p

‘40’ टक्क्यांवरून काँग्रेस आक्रमक

Amit Kulkarni