बेळगाव : महिला विद्यालय मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्यावतीने प्राथमिक विभागाच्या मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडांगणावर पार पडल्या. चव्हाट गल्ली, गणपत गल्ली, फुलबाग गल्ली, सदाशिवनगर, कॅम्प भागातील सरकारी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कविता परमाणिक उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत कॅम्प विभागाचे क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवन्नावर, क्रीडा शिक्षक सुनील केरवाड, पंकजा अमरगोळ, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपा बागेवाडी यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या क्रीडा ध्वज फडकावून स्पर्धांचे उद्घाटन झाले. स्मित गावडे, अभीनंद सिदनाळ, अवंती माळी, अवनी शेंबेकर, यांनी क्रीडा ज्योत घेतली. उमेर मुक्तार मोमीन यांनी खेळाडूंना शपथ दिली. प्रज्योती बाळेकुंद्री हिने आभार मानले. कार्यक्रमाला जे. बी. पटेल, मुकुंद, प्रकाश बजंत्री, भरमा तुपारे यांच्यासह इतर उपस्थित होते.
Previous Articleपोक्सो प्रकरणात येडियुराप्पांना दिलासा
Next Article बेळगाव रन स्पर्धेत ज्योती स्पोर्ट्स क्लबचे यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.