Tarun Bharat

मळेकरणी हायस्कूलचा क्रीडा महोत्सव थाटात

वार्ताहर /उचगाव

खेळामुळे आपले शरीर तंदुऊस्त राहण्यास मदत होते. यासाठी विद्यार्थ्यांनी रोज वेगवेगळे खेळ खेळत राहील पाहिजे. जीवनात विद्यार्थ्यांनी विद्यार्थी तसेच तंदुऊस्त राहा, खेळात चांगले नाव कमवा आणि आयुष्यात मोठे व्हा, असा मौलिक सल्ला अमरजोत शिक्षण सेवा मंडळाचे संस्थापक सेव्रेटरी जवाहर देसाई यांनी उचगाव येथील अमरजोत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या क्रीडांगणावर पार पडला. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक या नात्याने जवाहर देसाई बोलत होते.

या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी एस. पी. हलगेकर हे होते. कार्यक्रमाला  व्ही. एम. देसाई, करण पाटील, शितल कंग्राळकर, व्ही. व्ही देसाई, प्रतीक्षा भाट, दीपिका देसाई, एस. एच. चौगुले उपस्थित होते. उपस्थिताचे स्वागत व्ही. व्ही. देसाई यांनी केले. तर या क्रीडा स्पर्धांची सविस्तर माहिती, नियम व्ही. एम. देसाई व करण पाटील यांनी दिली.

यानंतर कबड्डी क्रीडांगणाचे पूजन अमरजोत शिक्षण सेवा मंडळाचे संस्थापक सेव्रेटरी जवाहर देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले. यावेळी कबड्डी, खो-खो, थ्रो बॉल, व्हॉलीबॉल, धावण्याच्या स्पर्धा, फिकीच्या स्पर्धा, जंपिंग अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा क्रीडांगणावरती घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा भाट यांनी केले. तर आभार करण पाटील यांनी मांडले.

Related Stories

मळेकरणी देवी परिसरातील झोपडपट्टय़ांवर कारवाई

Amit Kulkarni

हत्ती संशोधक-संरक्षक अजय देसाई यांचे निधन

Patil_p

सियाचीन ऑक्सिजन प्लांटबाबत सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

बापट गल्ली सांप्रदाय भजनी मंडळातर्फे कार्तिक दीपोत्सव साजरा

Amit Kulkarni

राष्ट्रीय ज्यु. ऍथलेटिक्स स्पर्धेत तुषार भेकणेचे उत्तम प्रदर्शन

Amit Kulkarni

पर्वरीत ‘कॅनाबिस’ची विक्री करणाऱया ‘कॅनाडॉक’ वर छापा

Patil_p