Tarun Bharat

व्यायामा व्यतिरिक्त ‘हे’ ही करू शकता…

Advertisements

मॉर्निंग वॉक :
चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत तसेच मूड फ्रेश होतो. कानात हेड फोन घालून आपण गाणे ऐकत देखील वॉकिंग करू शकतो.

खेळ :
आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता. कुठल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही.

स्विमिंग:
पोट कमी करण्यासाठी एकदम चांगला मार्ग म्हणजे स्विमिंग. आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.

झुम्बा :
आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.

दोरी उड्या :
जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसाल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शतपावली :
रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करणे गरजेचेचं आहे. किमान दहा मिनिट तरी चालले पाहिजे. जेवणानंतर लगेच झोपू नये. त्यामुळे पोट वाढण्याची दाट शक्यता असते.

Related Stories

पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढेल

Amit Kulkarni

भारतात समूह संसर्गाला सुरुवात : IMA

datta jadhav

55 लाखात वाढविली 2 इंच उंची

Patil_p

चांदोली धरणातून विसर्गाला सुरवात : वारणा नदी काठच्या गावांना इशारा, धरण ८३ टक्के भरले

Abhijeet Khandekar

कॅव्हिडमुळे मेंदूवर परिणाम

Amit Kulkarni

मेंदूला नाही म्हातारपण

Omkar B
error: Content is protected !!