वार्ताहर/उचगाव
उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेत आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत सुयश प्राप्त करून शाळेला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले. यामध्ये सांघिक गटात कबड्डी मुली प्रथम, फुटबॉल व खो खो मुले द्वितीय, 4स100 मीटर रिले मुले प्रथम, जिम्नॅस्टिक प्रथम. वैयक्तिक गटात तीर्थराज गोळा फेक, हॅमर थ्रो प्रथम ,थाळीफेक द्वितीय. निखिल लोहार उंच उडी प्रथम, भालाफेक ,ट्रिपल जंप द्वितीय. श्रेयश मन्नोळकर 800 मीटर धावणे प्रथम, मंथन ढोपे लांब उडी द्वितीय ,निरज लोहार 200 मीटर धावणे द्वितीय. प्रज्वल सावंत हॅमर थ्रो, गोळा फेक तृतीय. चौदा वर्षाखालील हरिभक्त तरळे थाळीफेक प्रथम ,श्रुती भांदुर्गे लांब उडी द्वितीय ,सलोनी तरळे 100 मीटर द्वितीय, 600 मीटर तृतीय. कुस्ती स्पर्धेत हरिभक्त तरळे प्रथम, श्रेया तरळे प्रथम ,साक्षी तरळे प्रथम, पूर्वा अतिवाडकर प्रथम, श्रावणी तरळे प्रथम ,हरिप्रिया साबंरेकर प्रथम ,तनवी तरळे द्वितीय ,कुस्तीमध्ये मुले साई साबंरेकर प्रथम ,मोहन तरळे प्रथम, योगेश तळे प्रथम, 14 वर्षाखालील लखन सांबरेकर प्रथम, प्रणव यादव प्रथम.