मोड आलेले पदार्थ का खावेत?
मोड आलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. तसेच व्हिटॅमिन सी युक्त मोड आलेले पदार्थ शरीरातील पांढर्या रक्त पेशींसाठी शक्तिशाली उत्तेजक बनवतात. हे उत्तेजक रोग आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असतात. उत्तेजक तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे
आपण आपल्या शरीराला काय देत आहोत. आपण जे खातो त्याचं प्रतिबिंब आपल्या त्वचेवर दिसून येतं. म्हणूनच मोड आलेल्या पदार्थांसोबत अन्य पोषणयुक्त आहार घेत राहा.
मोड आलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपले अन्न अधिक सहज पचविण्यास मदत होते. यामध्ये फायबरचे प्रमाण विशेषत: जास्त असते. हे फायबर मल तयार करण्यास उपयोगी ठरते. आतड्यांच्या आरोग्यासाठीही हे पदार्थ उत्तम आहेत.
तुम्हाला फक्त मोड आलेले पदार्थ खाल्ल्यावर खूप जड वाटत असेल तर त्याला उकडून घ्या. आणि त्यात उकडलेला बटाटा आणि तूप घाला.
मिक्स स्प्राउट्स आणि कॉर्न चाट- स्प्राउट्स वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. तुम्हा सर्वांना कडधान्याचे फायदे माहीत असतीलच. हे प्रथिने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या डाळींपासून तयार केले जाते. यामध्ये असलेले कॉर्न तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी हा चाट फायदेशीर आहे. हा चाट तयार करण्यासाठी मसूर, कॉर्न, टोमॅटो, कांदा आणि काही हलके मसाले मीठ, लिंबू, मिरपूड घालून मिक्स करा. तुम्ही हे नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅकमध्ये खाऊ शकता.
कसे तयार करावे स्प्राऊट्स
सर्वप्रथम तुम्हाला रात्रीच्या वेळीस किंवा 2 दिवस आधी मुग डाळ पाण्यात भिजत घालावी लागेल. मुगाला एकदा का मोड आले की तुम्ही पहिला टप्पा पार केला असे समजा. मग ही मोड आलेली मुग चांगल्या पद्धतीने पुन्हा धुवून घ्या. यात मग चिरलेला कांदा, टोमेटो, कोथिंबीर टाका

