Tarun Bharat

श्रीहरी, नितीन, पॉल संयुक्त आघाडीवर

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नई

2022 सालातील येथे सुरू झालेल्या 13 व्या चेन्नई खुल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर भारताचे नवोदित बुद्धिबळपटू एल.आर श्रीहरी, एस.नितीन आणि एस. पॉल यांनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.

या स्पर्धेतील चौथ्या फेरीत झालेल्या विविध पटावरील लढतीत श्रीहरीने व्हिएतनामच्या लुआँग हेनचा, एस.नितीनने व्हिएतनामच्या तियेन तसेच एस पॉलने भारताच्या अर्जुन तिवारीचा पराभव करत पूर्ण एक गुण वसुल केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या फेरीअखेर टॉप सीडेड बोरिस सँव्हेचेंको आणि बेलारूसच्या स्टुपेक यांनी प्रत्येकी चार गुण घेत संयुक्त आघाडी पटकाविली आहे. सदर स्पर्धा 10 फेऱयांची आहे. यामध्ये 11 ग्रॅण्डमास्टर्स आणि 14 आंतरराष्ट्रीय मास्टर्स यांच्यासह एकूण 275 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असून बक्षिसाची एकूण 15 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

Related Stories

सलग 3 शतके दुसऱयांदा झळकावणारा बाबर आझम पहिला फलंदाज

Amit Kulkarni

आशिष शहा यांचा ओडिशा एफसीला निरोप

Patil_p

पाकची झिम्बाब्वेवर 6 गडय़ांनी मात

Patil_p

माजी गरजू क्रिकेटपटूंसाठी 39 लाख रूपयांची मदत

Patil_p

हॉलंडचा आयर्लंडवर रोमांचक विजय

Amit Kulkarni

पी.गुणेश्वरन दुसऱया फेरीत

Patil_p
error: Content is protected !!