वृत्तसंस्था /चित्तगाँग
चंडीमल आणि डिक्वेला यांनी सातव्या गडय़ासाठी नोंदविलेल्या अभेद्य 99 धावांच्या भागिदारीच्या जोरावर लंकेने यजमान बांगलादेशविरूद्धची पहिली क्रिकेट कसोटी गुरूवारी अनिर्णीत राखली.
या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने पहिल्या डावात 397 धावा जमविल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 465 धावांचा डोंगर उभा करून 68 धावांची आघाडी मिळविली. बांगलादेशच्या दुसऱया डावात तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी शानदार शतके झळकविली. तत्पूर्वी लंकेच्या पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजने 199, कुशल मेंडीसने 54, दिनेश चंडीमलने 66 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे नईम हसनने 6 तर शकीब अल हसनने 3 तर टी इस्लामने 1 गडी बाद केला.
लंकेने 2 बाद 39 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. बांगलादेशच्या ताजुल इस्लामने कुशल मेंडीसचा 48 धावांवर त्र्खिाफळा उडविला. त्यानंतर ताजुल इस्लामने अँजेलो मॅथ्युजला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. कर्णधार करूणारत्नेने 52 धावा जमविल्या. ताजुल इस्लामने त्याला झेलबाद केले. शकीब अल हसनने धनंजय डिसिल्वाला रहीमकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 33 धावा जमविल्या. यावेळी लंकेची स्थिती 56.2 षटकांत 6 बाद 161 अशी केविलवाणी झाली होती.
संक्षिप्त धावफलक
लंका प.डाव 153 षटकांत सर्वबाद 397, बांगलादेश प. डाव 170.1 षटकांत सर्वबाद 465, लंका दु. डाव 90.1 षटकांत 6 बाद 260 (डिक्वेला नाबाद 61, चंडीमल नाबाद 39, करूणारत्ने 52, कुशल मेंडीस 48, धनंजय डिसिल्वा 33, टी इस्लाम 4-82, शकीब अल हसन 1-58).