Tarun Bharat

लंकेचा ऑस्ट्रेलियावर सहा गडय़ांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ पल्लीकेले

पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान लंकेने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. रविवारी येथे झालेल्या तिसऱया दिवस-रात्रीच्या सामन्यात लंकेने ऑस्ट्रेलियाचा 6 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. लंकन संघातील शतकवीर पथूम निसांकाला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.

या तिसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 6 बाद 291 धावा जमवित लंकेला विजयासाठी 292 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर लंकेने 48.3 षटकांत 4 बाद 292 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी आणि 9 चेंडू बाकी ठेवून जिंकला. या विजयामुळे लंकेने या मालिकेत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावात हेडने 65 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 70, कर्णधार फिंचने 85 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 62, कॅरेने 52 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 49, लाबुशानेने 36 चेंडूत 1 चौकारांसह 23, मॅक्सवेलने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33, ग्रीनने 12 चेंडूत 1 षटकारांसह नाबाद 17, मिशेल मार्शने 1 चौकारांसह 10 व सलामीच्या वॉर्नरने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 7 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. हेड आणि कॅरे यांनी पाचव्या गडय़ासाठी 72 धावांची भागिदारी केली. कर्णधार फिंच आणि लाबुशाने यांनी तिसऱया गडय़ासाठी 69 धावांची भर घातली. लंकेतर्फे जेफ्री व्हँडेरसेने 49 धावांत 3 तर चमिरा, वेललगे, डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीचा फलंदाज निसांकाने दमदार शतक नोंदवीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. निसांकाने डिक्वेलासमवेत सलामीच्या गडय़ासाठी 42 धावांची भर घातली. डिक्वेलाने 5 चौकारांसह 25  धावा जमविल्या. डिक्वेला बाद झाल्यानंतर निसांका आणि कुशल मेंडीस या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 170 धावांची भागिदारी करीत संघाला विजयासमीप आणले. दुखापतीमुळे कुशल मेंडीस निवृत्त झाला. त्याने 85 चेंडूत 8 चौकारांसह 87 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वाने 17 चेंडूत 4 चौकारांसह 25, असालेंकाने 12 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. निसांकाने 147 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 137 धावा झळकविल्या. कर्णधार शनाका खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. लंकेच्या डावात 3 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे जे रिचर्डसनने 2 तर हॅजलवूड आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 6 बाद 291 (वॉर्नर 9, फिंच 62, मार्श 10, लाबुशाने 29, कॅरे 49, हेड नाबाद 70, मॅक्सवेल 33, ग्रीन नाबाद 15, व्हृँडेरसे 3-49, चमिरा 1-49, वेलालगे 1-56, डिसिल्वा 1-35)

लंका 48.3 षटकांत 4 बाद 292 (डिक्वेला 25, निसांका 137, कुशल मेंडीस 87, डिसिल्वा 25, असालेंका नाबाद 13, जे. रिचर्डसन 2-39, हॅजलवूड 1-57, मॅक्सवेल 1-44).

Related Stories

ऍस्टन व्हिलाची लिसेस्टरवर मात

Patil_p

यूपी योद्धा संघ प्लेऑफ गटात दाखल

Patil_p

डुप्लांटिस, अमुसन यांना विश्वविक्रमासह सुवर्ण

Patil_p

हिमा दासचे सुवर्ण कोरोना योद्धय़ांना समर्पित

Patil_p

भारत-द.आफ्रिका पहिली कसोटी प्रेक्षकांविना होणार

Patil_p

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

Patil_p