दुबई : शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने बांगलादेशला 2 गडय़ांनी नमवत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील आपले स्थान निश्चित केले. बांगलादेशने 7 बाद 183 धावा जमवल्यानंतर लंकेने 19.2 षटकात 8 बाद 184 धावांसह विजय संपादन केला. लंकेतर्फे कुशल मेंडिसने सर्वाधिक 60 तर शनाकाने 45 धावांचे योगदान दिले. आज या स्पर्धेत पाकिस्तान-हाँगकाँग यांच्यात शेवटचा साखळी सामना होत असून उद्यापासून सुपर-4 फेरीला प्रारंभ होईल
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : 20 षटकात 7 बाद 183 (मेहदी हसन मिराझ 26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 38, अफिफ होसेन 22 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 39, महमुदुल्लाह 27, मोसदेक होसेन 9 चेंडूत नाबाद 24. अवांतर 10. हसरंगा व करुणारत्ने प्रत्येकी 2 बळी).
श्रीलंका : 19.2 षटकात 8 बाद 184 (कुशल मेंडिस 37 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 60, दसून शनाका 33 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 45, पथूम निस्सांका 19 चेंडूत 20. अवांतर 17. इबादोत होसेन 3-51, तस्किन अहमद 2-24, रहमान, मेहदी हसन प्रत्येकी 1 बळी).