Tarun Bharat

लंकेचा ऑस्ट्रेलियावर 26 धावांनी थरारक विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ पल्लीकेले

पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील गुरूवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात यजमान लंकेने ऑस्ट्रेलियाचा डकवर्थ-लेवीस नियमाच्या आधारे 26 धावांनी पराभव केला. या विजयामुळे लंकेने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचानी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 43 षटकांत 216 धावांचे नवे उद्दीष्ट दिले होते. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लंकेने 47.4 षटकांत 9 बाद 220 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर लंकेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव 37.1 षटकांत 189 धावांत आटोपला.

लंकेच्या डावामध्ये कुशल मेंडीसने 41 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 36, धनंजय डिसिल्वाने 41 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, गुणतिलकाने 1 चौकारांसह 18, निशांकाने 3 चौकारांसह 14, कर्णधार शनाकाने 36 चेंडूत 5 चौकारांसह 34, वेलागेने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 20, करूणारत्नेने 1 षटकारांसह 18 आणि तिक्ष्णाने 1 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 45 धावांत 4, कुहेनमन आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 तर स्वेप्सनने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 37.1 षटकांत 189 धावांत आटोपला. वॉर्नरने 5 चौकारांसह 37, फिंचने 2 चौकारांसह 14, स्टीव्ह स्मिथने 3 चौकारांसह 28, हेडने 2 चौकारांसह 23, लाबुशाने 18, कॅरेने 1 चौकारांसह 15, मॅक्सवेलने 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 20 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे करूणारत्नेने 3, धनंजय डिसिल्वा, वेलालगे आणि चमिरा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. लंकेच्या भेदक फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 216 धावांचे उद्दिष्ट गाठता आले नाही.

संक्षिप्त धावफलक ः लंका प. डाव- 47.4 षटकांत 9 बाद 220 (गुणतिलका 18, निशांका 14, कुशल मेंडीस 36, धनंजय डिसिल्वा 34, असालेंका 13, शनाका 34, करूणारत्ने 18, वेलालगे 20,तिक्ष्णा नाबाद 11, कमिन्स 4 बळी, कुहेनमन, मॅक्सवेल प्रत्येकी 2 बळी, स्वेप्सन 1 बळी), ऑस्ट्रेलिया- 37.1 षटकांत सर्वबाद 189 (वॉर्नर 37, फिंच 14, स्टीव्ह स्मिथ 28, हेड 23, लाबुशाने 18, कॅरे 15, मॅक्सवेल 30, चमिरा, धनंजय डिसिल्वा, वेलालगे प्रत्येकी 2 बळी, करूणारत्ने 3-47).

Related Stories

शरथ कमल, मनिका यांचे ऑलिंपिक तिकीट निश्चित

Patil_p

पीव्ही सिंधू दुसऱया फेरीत

Patil_p

लंका दौऱयासाठी शिखर धवनकडे नेतृत्व?

Patil_p

हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p

राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धा लांबणीवर

Patil_p

दिल्लीचा मुंबई इंडियन्सला पराभवाचा ‘शॉक’!

Patil_p
error: Content is protected !!