ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Sri Lankan batsman Danushka Gunathilaka arrested in Australia श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली आज पहाटे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे अटक करण्यात आली.
दनुष्का ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झाला होता. शनिवारी श्रीलंकेने इंग्लंडविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आज पहाटेच दनुष्काला अटक करण्यात आली. त्यामुळे आज सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला.
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डेटिंग ॲपच्या माध्यमातून भेट झालेल्या 29 वर्षीय तरुणीने दनुष्कावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनीच्या पूर्वेकडील ससेक्स स्ट्रीट येथील हॉटेलमध्ये मागील आठवड्यात दनुष्काने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. दनुष्काला आज सिडनीतील न्यायालयात हजर केलं जाणार आहे.