क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक अ. भा. निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एचसीव्ही संघाने बेळगाव वॉरियर्सचा 35 धावांनी, एसआरएस हिंदुस्थानने चॉईस इलेक्हन यमकनमर्डी संघाचा 6 गड्यांनी, एसएसएस फाऊंडेशनने कॉलेज बॉईज संघाचा 8 गड्यांनी तर एसआरएस हिंदुस्थानने एचसीक्हीचा 3 गड्यांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. संतोष सुळगे-पाटील, प्राजेश, हणमंत कोकितकर, गुऊप्रसाद आरोसकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एचसीव्ही बेळगावने 10 षटकात 7 बाद 124 धावा केल्या. त्यात प्राजेश नाईकने 42, तर संतोषने 35 धावा केल्या. बेळगाव वॉरियर्सतर्फे तबरेजने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर्सने 10 षटकात 7 गडी बाद 89 धावा केल्या. त्यात नूर मुल्लाने 34 धावा केल्या. एचसीव्हीतर्फे ऊपेशने 3 तर प्रशांतने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात चॉईस इलेव्हन यमकनमर्डीने 10 षटकात 7 बाद 78 धावा केल्या. मुजीद नालबंदने 24 धावा तर अक्रमने 23 धावा केल्या. एसआरएसतर्फे अमर गाडेकरने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस संघाने 7.1 षटकात 4 गडी बाद 80 धावा करून सामना जिंकला. त्यात प्राजेश नाईकने 26 तर गुऊप्रसादने 20 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात कॉलेज बॉईज खानापूर संघाने 7.5 षटकात सर्व बाद 57 धावा केल्या. भीमाने 16 धावा केल्या. एसएसएस फाऊंडेशनतर्फे हणमंत व अभिजीत यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसएसएस फाऊंडेशनने 4.1 षटकात 2 बाद 58 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. अनिल बोकमूरकरने 28 धावा केल्या. चौथ्या सामन्यात एचसीव्ही बेळगाव संघाने 10 षटकात 7 बाद 101 धावा केल्या. त्यात प्राजेश नाईकने 47 तर दर्पणने 19 धावा केल्या. एसआरएसतर्फे हर्षदने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएसने 9.4 षटकात 7 गडी बाद 105 धावा करून सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात गुऊप्रसाद आरोसकरने नाबाद 45 तर गोपाळने 16 धावा केल्या. एचसीव्हीतर्फे प्रशांत 3 तर किरणने 2 गडी बाद केले.
आजचे सामने
1) फँको स्पोर्ट्स क्लब विऊद्ध मुˆाभाई सकाळी 9 वा., 2) शिव इलेव्हन खानापूर वि. मराठा स्पोर्ट्स बेळगाव, स. 11 वा. 3) अयोध्या कडोली वि. हुक्केरी स्टार्स, दु. 1 वा. 4) फौजी इलेव्हन वि. सरदार इलेव्हन, दु. 3 वा.