Tarun Bharat

SSC Result 2021 Maharashtra Board: ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल


मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या २०२१ परीक्षेचा निकाल हा,आज, १६ जुलै २०२१रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजता ऑनलाईन समजणार आहे. मात्र हा निकाल कसा पाहायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे. तर हा निकाल या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

दहावीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट आणि mahresult.nic.in, result.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल खालील वेबसाईटवर पाहता येणार आहे.

mahresult.nic.in

result.mh-ssc.ac.in

sscresult.mkcl.org

maharashtraeducation.com


दहावीचा निकाल कसा पाहता येणार?

सगळ्यात पहिला MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे टाकावं लागेल.

त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

यानंतर तुम्ही निकालाची प्रिंट देखील काढू शकता.

Related Stories

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचे फडणवीसांना आमंत्रण नाही ; भाजप नेते नाराज

Archana Banage

सातारा : ‘वाठार किरोलीच्या युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी’

Archana Banage

कर्नाटक: एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Archana Banage

अर्णिका गुजर भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक

Patil_p

कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढू

Patil_p

Tokyo 2020 : भारतीय महिला संघाची उपांत्यफेरीत धडक

Archana Banage