Tarun Bharat

वेंगुर्ले आगारातून मठमार्गे जाणाऱ्या एस.टी.बस बुधवारपासून बाजारपेठ-मारूती स्टाँप मार्गे

वेंगुर्ले /वार्ताहर-

वेंगुर्ले आगारातtन मठमार्गे जाणाऱया सर्व बसेस वेंगुर्ले नगरपरीषदेने बाजारपेठ मार्गे जाण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहारामुळे बुधवार दि. 29 जूनपासून पासून वेंगुर्ले जूना एस.टी. स्टँण्ड दाभोलीनाका-बाजारपेठ-मारूतीस्टाँप मार्गे तर मठ मार्गे वेंगुर्लेस येणाऱ्या सर्व एस.टी. गाडया हाँस्पीटल कँम्प, पाँवर हाऊस, रामेश्वर मार्गे वेंगुर्ले आगारांत येतील. याची एस.टी.च्या सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक श्री. शेवाळे यांनी केले आहे.वेंगुर्ले नगरपरीषदेच्या बाजारपेठेत येणाऱया सर्व नागरीकांनी गाडीअड्डा तिठा ते सारस्वत बँक हा `नो पार्कीग झोन’ असून या मुख्य बाजारपेठ रस्त्यावर कोणीहि दुचाकी, तिन चाकी, चारचाकी यासह अन्य वाहने उभी (पार्कींग) करू नयेत. नो पार्कीग एरीयांत वाहने उभी (पार्किंग) केल्यास दंडात्मक कारवाई करण्यांत येईल असे जाहिर केले आहे.नगरपरीषद मार्केट लगतच्या एस.टी. बस जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी, चारचाकी हि वाहने उभी (पार्कींग) करू नयेत. नगरपरीषदेच्या सागररत्न मच्छिमार्केटच्या तळमजल्यावर वाहनांना नगरपरीषदेतर्फे पार्कीगची व्यवस्था करण्यांत आलेली आहे. त्याचा लाभ नागरीक, व्यापारी व वाहन धारकांनी घेऊन नरपरीषदेस व वेंगुर्ले आगारास सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी डॉ, अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांचीही संपकरी एसटी कर्मचाऱयांकडे पाठ

Patil_p

सुन्न शहर, निःशब्द पिंपळकट्टा

NIKHIL_N

बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाने कोकणात अतिवृष्टी

Patil_p

खेड शिवसेनेतर्फे पेट्रोल – डिझेल दरवाढीचा निषेध

Archana Banage

विमानतळाला बॅ. नाथ पैंचे नाव देण्याचा प्रस्ताव देणार!

NIKHIL_N

मनाई आदेशामुळे रक्त दरवाढ विरोधातील रक्तदान आंदोलन स्थगित !

Anuja Kudatarkar