क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स पब्लिक स्कुलच्या 24 व्या स्थापना दिनानिमित्त फिनिक्स चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या आज खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटपॉल्स संघाने ज्ञानप्रबोधन संघाचा तर दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटमेरीजने मराठा मंडळचा 57 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. निल पवार सेंटपॉल्स, साईनाथ तोरगल मेरिज यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फिनिक्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटपॉल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 135 धावा केल्या. त्यात साईश साळुंखेने 56 तर निल पवारने 30 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे गंगाधर व शोनान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना ज्ञानप्रबोधनी संघाचा डाव 131 धावात आटोपला. त्यात नवीन एस. ने 42, सुजल काकतकरने 48 धावा केल्या. सेंटपॉल्सतर्फे निल पवारने 3 तर सुमेदने 2 गडी बाद केले.
दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटमेरीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 152 धावा केल्या. यात ऋग्वेद एस. ने 34 तर शौनक कोरेने 35 धावा केल्या. मराठा मंडळातर्फे सर्वेशने 3 गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना मराठा मंडळने 20 षटकात 5 गडी बाद 94 धावाच केल्या. त्यांच्या प्रेम इंगळेने 29 धावा केल्या. मेरीजतर्फे सार्थक पन्नारेने 3 गडी बाद केले. शुक्रवारी दि. 25 रोजी अंतिम सामना सेंटपॉल्स विरुद्ध सेंटमेरीज यांच्यात खेळविण्यात येणार आहे.