आषाढी यात्रा सोहळा : भाविकांच्या सोयीसाठी एसटी, रेल्वे विभाग सज्ज : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार प्रवाशांवर नजर
संतोष रणदिवे/पंढरपूर
आषाढी यात्रेचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला जाणार आहे. भाविकांना पंढरपूरपर्यंत येण्यासाठी एसटी व रेल्वे प्रशासनाकडून सोय करण्यात आली आहे. पंढरपुरात प्रवाशांच्या सोयीसाठी चार ठिकाणी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. रेल्वेकडून प्रवाशांसाठी 13 रेल्वे गाडय़ांची सोय करण्यात आली आहे.
आषाढी वारीत भाविकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी पंढरपूर बसस्थानक आगारातून बसची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाविक पोहोचण्यासाठी पंढरपूर शहरात एक तर शहराबाहेर तीन बसस्थानके तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी भाविकांच्या सुरक्षेस्तव सर्व ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात आले आहेत. संगणकाद्वारे आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. शौचालय, वीज व फिल्टरच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
अशी असणार बसस्थानके चंद्रभागानगर
(डीव्हीपी थिएटर्ससमोरील इमारत)
याठिकाणाहून पुणे, सातारा, रायगड, ठाणे, मुंबई, पालघरसाठी गाडय़ा सुटतील.
भीमा बसस्थानक (तीन रस्ता, शेगाव दुमाला)
सर्व अमरावती प्रदेश, नागपूर प्रदेश, औरंगाबाद प्रदेशसाठी गाडय़ा सुटतील.
(मराठवाडा व विदर्भ विभाग)
विठ्ठल बसस्थानक (विठ्ठल कारखाना, गुरसाळे)
नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर गाडय़ा सुटतील.
पांडुरंग (आयटी शेजारी, कासेगाव रोड)
रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी गाड्य़ा सुटतील.
रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक
पंढरपूर-मिरज, सोलापूर-पंढरपूर, कुर्डुवाडी-मिरज, लातूर-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर,नागपूर-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, जालना-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, औरंगाबाद-पंढरपूर या गाडय़ा पंढरपूर रेल्वेस्थानक येथून ये-जा करणार आहेत.