Tarun Bharat

सेंट झेवियर्स अंतिम फेरीत

Advertisements

बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स संघाने इस्लामिया संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

कनक मेमोरियल स्कूलच्या मैदानावर आयोजित फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स संघाने इस्लामिया संघाचा एकमेव गोलने पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला इस्लामियाच्या रायन पटवेकरने गोल करण्याची नामी संधी दवडली. 41 व्या मिनिटाला रोशन  झियान मुल्लाने गोल करून सेंट झेवियर्स संघाला आघाडी मिळवून दिली. ही त्यांनी अखेरपर्यंत कायम राखत विजय साकार केला.

Related Stories

कारिटस इंडिया, बेळगाव डायोसीसतर्फे बिम्सला 25 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर

Amit Kulkarni

युनिव्हर्सल ग्रुपतर्फे पोलिसांना रेनकोटचे वाटप

Amit Kulkarni

ब्रह्मदेव मंदिरात चोरीचा प्रयत्न

Omkar B

गोल्फ मैदान परिसरातील 22 शाळांना बुधवारी सुट्टी

Nilkanth Sonar

विनाअनुदानित प्राध्यापक-शिक्षकांना वाली कोण?

Patil_p

परिवहन कर्मचाऱयांचा संप : प्रवाशांचे होताहेत हाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!