क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्पमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून फादर जो. डिसोजा तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक फादर सिरील ब्रॉग्स, एनसीसी अधिकारी रवि घाटगे, सुभेदार रणजित सिंग, नायक सुभेदार मनविदंर सिंग, क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारिओ व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक फादर सिरील ब्रॉग्स यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहन करण्यात आले. शाळेच्या 4 क्रीडापथकांनी शानदार पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रीय क्रीडापटू अलिशा बोर्जेस, आर्या गायकवाड, सई मुंगारे, वसुंधरा चव्हाण, सार्थक श्रेयकर यांनी क्रीडाध्वज मैदानाभोवती फिरून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी आहाना मस्केवाले हिने सर्व क्रीडापटूंच्या वतीने शपथ देवविली. मुख्याध्यापक फादर सिरील ब्रॉग्स यांनी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी लेस्टर डिसोजा, क्रीडाशिक्षिका ज्युलेट फर्नांडिस, दीपा सत्तेगिरी, संतान मेन्डोसा, ऍग्नेलो रॉड्रिक्स, मायकल लोबो, रेनेटा फर्नांडिस उपस्थित होते.