बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आदेशा प्रमाणे वनिता विद्यालय कन्नडव मराठा स्कुल आयोजित कॅम्प विभागीय 17 वर्षाखालील मुलां-मुलींच्या बॉस्केटबॉल स्पर्धेत मुलच्या अटात सेंट झेव्हीयर्सने सेंट पॉल्स संघाचा तर मुलेच्या गटात सेंट जोसेफने वनिता विद्यालयचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सेंट झव्हियर्स स्कुलच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण म्हणून झेव्हियर्ग स्कुलचे प्रार्चाय फादर सिरीयल बॅक्स, चस्टर रोझारीयो, लिना पेस, ग्रेसी पेस, निडोनी,संजय चॉल्स, आदी मान्यवर उपस्थित उद्घाटन करण्यात आले. मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटपॉल्सने जीए संघाचा 15-3 असा गुणानी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट झेव्हियर्सने सेंटपॉल्सचा 11-6 असा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलीच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वतिना विद्यालय संघाने सेंट झेव्हियर्सचा 7-2 असा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट जोसेफ संघाने वनिता विद्यालयाचा 10-2 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. वरील दोन संघ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून व्ही.एस. पाटील, अलीसय्यद, विनित यांनी काम पाहिले.
Previous Articleसीए इनडोअर स्पर्धांना प्रारंभ
Next Article शहापूर विभागीय बुद्धिबळ-योगा स्पर्धा उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.