Tarun Bharat

सेंट झेवियर्स, वनिता विद्यालय बास्केटबॉल स्पर्धेत विजेते

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित कॅम्प विभागिय क्रीडा स्पर्धेत मुलांच्या बास्केटबॉलमध्ये सेंट झेवियर्स संघाने जीए स्कूल संघाचा तर मुलींमध्ये वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम संघाने सेंट जोसेफ संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

सेंट झेवियर्स स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफ संघाने सेंट झेवियर्स संघाचा 7-2 अशा फरकाने तर दुसऱया उपांत्य सामन्यात वनिता विद्यालय संघाने जीए स्कुल संघाचा 26-2 असा पराभव केला. अंतिम सामन्यात वनिता विद्यालय संघाने सेंट जोसेफ संघाचा 29-2 असा पराभव करून जेतेपद पटकावले.

मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात जीए संघाने महिला विद्यालय संघाचा 5-4, तर दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने सेंट पॉल्सचा 11-6 असा पराभव केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने जीएचा 8-2 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रेव्ह. फादर चार्ली ब्राजेस, नागराज भगवंतण्णावर, चेस्टर रोजारिओ, संजय चार्ल्स, लिना डिसुझा, व्हीएस पाटील, निडोनी आदी मान्यवरांच्या हस्ते संघांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.

Related Stories

ब्लॅक संडेने नागरिक हैराण

Patil_p

ऑनलाईन पासपोर्ट काढणे झाले सोपे

Patil_p

मराठा अभिवृद्धी निगमला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्या

Amit Kulkarni

परिवहन मंडळाला दररोज 80 लाखाचा फटका

Patil_p

रसिक रंजनतर्फे उद्या ‘देव वाणी-मंगल गाणी’

Amit Kulkarni

मतदारयादी विभाजनाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!