ऑनलाईन टीम/तरुण भारत
आणखी एका भारतीयाने आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय कंपनीत अव्वल स्थान मिळवले आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉफी कंपनी स्टारबक्सने (starbucks) भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन (Laxman Narasimhan) यांची नवीन सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. नरसिंहन हे हॉवर्ड शुल्त्झ यांच्या जागी १ ऑक्टोबरपासून स्टारबक्सचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.
दरम्यान, स्टारबक्सने जारी केलेल्या निवेदनात, नरसिंहन लंडनहून सिएटलला स्थलांतरित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते १ ऑक्टोबरपासून कंपनीमध्ये सीईओ म्हणून रुजू होतील. तर शुल्त्झ हे एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील, त्यानंतर ते स्टारबक्स संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील.
अनेक नामांकित कंपन्यांमध्ये केलं आहे काम
तर, ५५ वर्षीय नरसिंहन यांनी लायसोल आणि एन्फामिल बेबी फॉर्म्युलाचे निर्माते यूके स्थित रेकिट बेंकिसर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन म्हणाले, “कंपनीचा विश्वास आहे की आम्हाला पुढील सीईओच्या माध्यमातून एक असाधारण व्यक्ती मिळाली आहे.” त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत.
स्टारबक्सने जारी केलेल्या निवेदनात नरसिंहन लंडनहून सिएटलला स्थलांतरित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते १ ऑक्टोबरपासून स्टारबक्समध्ये सीईओ म्हणून रुजू होतील. हॉबसन यांनी सांगितले की, स्टारबक्स बोर्डाने नरसिंहन यांना सहाय्य करण्यासाठी शुल्त्झ यांना एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम सीईओ म्हणून राहण्यास सांगितले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, नरसिंहन सीईओची भूमिका स्वीकारतील आणि १ एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळात सामील होतील.