मेलबर्न / वृत्तसंस्था
मिशेल मार्श, मिशेल स्टार्क व मार्कस स्टोईनिस हे ऑस्ट्रेलियन त्रिकुट दुखापतीमुळे भारत दौऱयात सहभागी होऊ शकणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. स्टार्क गुडघ्याच्या दुखापतीमुळे तर मार्श व स्टोईनिस अनुक्रमे पायाचा घोटा व कमरेच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकले गेले. पुढील महिन्यात मायदेशात होणाऱया टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका स्वीकारणे योग्य नसल्याने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. स्टार्क, मार्श व स्टोईनिस यांच्याऐवजी नॅथन इलिस, डॅनिएल सॅम्स व सीन ऍबॉट यांना समाविष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन संघ मोहाली, नागपूर व हैदराबाद येथे अनुक्रमे दि. 20, 23 व 25 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध 3 टी-20 सामने खेळणार आहे.