Tarun Bharat

बिदर आणि हैदराबादला एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करा

Advertisements

बेळगाव रेल्वे स्थानकावरून बिदर व हैदराबाद या दोन शहरांना रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगाव मधून बिदर व हैदराबाद या दोन्ही शहरांना एक्सप्रेस रेल्वे सुरू करावी अशी मागणी बेळगाव मधील जेष्ठ नागरिकांनी गुरुवारी निवेदनाद्वारे खासदार मंगला अंगडी यांच्याकडे केली. बेळगाव बिदर रेल्वे सेवा सुरू झाल्यास बिदर शहराला जाणाऱ्या प्रवाशांसोबतच बनशंकरी, गुलबर्गा व गंगावती येथे पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. बेळगाव मधून शेकडो भाविक बनशंकरी देवस्थानला भेट देत असतात. त्यामुळे या प्रवाशांची सोय होईल असे निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊनपूर्वी बंद झालेली कोल्हापूर- हैदराबाद रेल्वे अडीच वर्षे उलटले तरी अद्याप बंदच आहे. बेळगाव शहरातील शेकडो विद्यार्थी हैदराबाद येथे शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक जण आयटी कंपन्यांमध्ये नोकरीही करीत आहेत. त्यांना येण्या-जाण्यासाठी खाजगी बसचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे बेळगाव- हैदराबाद या मार्गावर एक्सप्रेस सुरू केल्यास विद्यार्थी व नोकरदारांची सोय होईल.
खासदार मंगला अंगडी यांनी निवेदन स्वीकारून आपण रेल्वे बोर्ड कडे हे निवेदन पाठवून देऊ असे आश्वासन दिले.यावेळी जी.के. कुलकर्णी, एम. के. कुलकर्णी यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

चाँदशिरदवाड क्रीडांगण बनले तालुक्मयात मॉडेल

Omkar B

शुभम, अंकुश, ऍड.अमर येळ्ळूरकर यांना जामीन

Omkar B

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, बीडीके हुबळी अ विजयी

Amit Kulkarni

भरत जगताप यांना अत्रे पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

हंदिगनूर नियोजित तलावाची कागदपत्रे सुपूर्द

Patil_p
error: Content is protected !!