Tarun Bharat

बकरी बाजार तातडीने सुरू करा

मटण शॉप वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

बेळगाव : लम्पिस्कीनमुळे बकरी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बकऱयांचा तुटवडा जाणवत आहे. मागणी अधिक आहे. मात्र बकरी नाहीत, त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून तातडीने बकरी बाजार सुरू करावेत, अशी मागणी बेळगाव मटण शॉप वेल्फेअर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लम्पिस्कीन आजाराने जनावरे दगावत आहेत. याचबरोबर अनेक जनावरे आजारी पडत आहेत. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे. याचबरोबर बकरी बाजारही बंद करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे बकरी मिळणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने बकरी बाजार खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव मटण शॉप असोसिएशनचे अध्यक्ष उदय घोडके, राजू कांबळे, खताल सरजेखान, आदर्श घोडके, मोईस सरजेखान, मोसीन पटेल यांच्यासह मटण विपेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

गुरुवारपेठ टिळकवाडी येथे रस्त्यावर टाकला जातोय कचरा

Amit Kulkarni

आजपासून शाळा गजबजणार

Patil_p

बेळगावच्या तत्कालीन तहसीलदारांना 12 हजारांचा दंड

Amit Kulkarni

विनामास्क कारवाईकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

गोगटे चौकातील उद्यानाचा विकास बारगळला

Amit Kulkarni