तरुण भारत

डिगस ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधातील उपोषणाला प्रारंभ

डिगस/वार्ताहर-

डिगस ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराकडे अनेकवेळा लक्ष वेधूनहि योग्य ती कार्यवाहि होत नसल्याने कुडाळ पंचायत समितीच्या पारदर्शी कारभाराबाबत प्रMनचिन्ह उभे राहत असल्याचा आरोप बुद्धनाथ गोसावी यांनी केला आहे. या कारभारावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी 13 मे रोजी डिगस ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत उपोषण छेडले आहे.

Advertisements


कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, डिगस ग्रामपंचायत व्यवस्थापनाच्या ढिसाळ, मनमानी व भ्रष्ट कारभाराबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कामकाजात अनियमिता दर्शवणारे सात मुद्दे निदर्शनास आणण्यात आले होते. मात्र, पंचायत समिती कार्यालयाकडून या संदर्भात अद्यापपर्यंत कोणतीहि ठोस कार्यवाहि न झाल्याने ग्रामस्थाच्या भावना तीव्र असून पंचायत समिती कार्यालयाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. सामान्य जनतेच्या कर स्वरुपी पैशांवर राजरोसपणे शासन नियम व मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवून डल्ला मारला जात आहे. याबाबत जबाबदार अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर या कार्यपद्धतीचा तीव्र स्वरुपात निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. तर कुंपणच शेत खात असल्याचा आरोपहि केला असून दाद तरी कुणाकडे मागायची असा सवाल उपस्थित केला आहे.

Related Stories

‘जनशताब्दी’च्या बिघाडामुळे ‘कोरे’चे वेळापत्रक विस्कळीत

Patil_p

जानेवारीचे वेतन देयक सेवाज्येष्ठता यादी सादर केल्यावरच स्वीकारणार

Abhijeet Shinde

रत्नागिरी : चिपळूणच्या असुर्डे धरणात महिलेसह दोन मुलांचे मृतदेह

Abhijeet Shinde

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिह्यात24 हजार खटले प्रलंबित

Patil_p

खेडमध्ये पावणे दोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त

Patil_p
error: Content is protected !!