Tarun Bharat

स्टार्टअपचा बोलबाला!

जवळपास तीन दशकांच्या अथक प्रयत्नानंतर भारताचा स्टार्टअपच्या क्षेत्रात बोलबाला झालेला आहे. अमेरिका, चीन आणि इंग्लंड या देशांच्या पाठोपाठ भारताने या क्षेत्रात पाऊल टाकले आणि आता 70 हजार कंपन्यांच्या जोरावर आणि त्यातल्याही तब्बल शंभर युनिकॉर्न कंपन्या म्हणजे शंभर कोटीच्यावर भाग भांडवल आणि स्वतःची गुंतवणूक करण्याची क्षमता निर्माण झालेल्या कंपन्यांची वाढत चाललेली संख्या, जगाच्या नजरेत भरू लागली आहे. इंग्लंडला मागे टाकून या क्षेत्रात भारत तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उजबेकिस्तानच्या समरकंद येथे शांघाय सहकार्य परिषदेत बोलताना भारताच्या या गौरवशाली यशाचे कौतुक करत, या क्षेत्रातील भारताचा अनुभव इतर देशास वाटण्याची तयारी दर्शवली. जगभरात निर्माण झालेली अन्नटंचाई आणि पुरवठा साखळीमधील विखंड दूर करण्याची अपेक्षा त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली. जगाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाण्यासाठी हे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी मत मांडले. प्रचंड महागाईने जगभरातील जनता त्रस्त असताना भारतसुद्धा त्यापासून मुक्त राहिलेला नाही. जगणे सर्वसामान्यांच्या आवाक्मया बाहेर जात असताना, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱया देशांसमोर त्यांनी शांततेचे आवाहन केले. जगात सर्वसामान्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असताना ग्राहकांच्या हितासाठी काम करणाऱया संस्था, संघटना चिडीचूप बसलेल्या आहेत. अशा काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर प्रचंड ताण येतो. आजच्या स्थितीत जगभर सर्वसामान्य जनता या आगीत होरपळून निघत आहे. जगात अनेक ठिकाणी केवळ पुरवठा साखळय़ा नसल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती कोणत्याही देशात निर्माण होऊ शकते. अशा काळात सर्वसामान्यांनी जगायचे कसे हा प्रश्न असतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि बरोबरीने रोजगार, शिक्षण आणि आरोग्य याही जीवनासाठी अत्यावश्यक बाबी आहेत. कोरोनाकाळात प्रकर्षाने याची जाणीव झाली. त्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना युद्धाचे ढग जमले आणि जगाची उपासमार झाली. या फटक्मयातून अजूनही जग सावरलेले नाही. अशा बेभरोशी वातावरणात जगायचे कसे आणि रोजगार मिळवायचा कसा? हा सर्वसामान्यांसमोरचा प्रश्न असतो. अशा काळात भारतातील स्विगी सारख्या अन्नपुरवठा करणाऱया स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱयांना कामावर परिणाम न करता दुसरे काम करण्याची मोकळीक दिली आहे. वास्तविक अशी कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने ही तडजोड आहे, असा एक सूर समाजात असताना, लोकांनाही जगण्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे आणि त्यासाठी ते अन्नपुरवठय़ाचे हे काम करायला तयार होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. कठीण काळात एकमेकांच्या सहकार्याने वाटचाल करण्याची ही पद्धत जुनी आहे. पंतप्रधानही त्याच पद्धतीने इतर देशांच्या विकासासाठी स्टार्टअप कंपन्यांच्या यशाचे ज्ञान देण्यास तयार झाले आहेत. स्टार्टअप कंपन्यांमध्ये केलेली आपली गुंतवणूक बुडणार नाही ना याची चिंता गुंतवणूकदारांना असते. मात्र भारतात 100 पेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्यांना मिळालेले यश आणि त्यांची युनिकॉर्न कंपन्यांमध्ये होत असलेली गणना लक्षात घेऊन, जग भारतीय कंपन्यांकडे कुतूहलाने पाहत आहे. 2010 साली विजय शेखर शर्मा यांनी सुरू केलेली पेटीएम नोटबंदी नंतर आणि कोरोना काळात प्रचंड लोकप्रिय झाली. 2013 मध्ये रितेश अग्रवाल यांनी सुरू केलेली ओयो ही स्वस्तात हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देणारी कंपनी, त्याच्याही दोन वर्षे आधी विजू रवींद्र यांनी सुरू केलेली बायजूस, 2011 मध्ये बेंगळूरुमध्ये किराणामाल घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय करणारी व्ही एस सुधाकर आणि पाच पार्टनरची बिग बास्केट ही कंपनी, 2015 मध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी सुरू झालेली अन्अकॅडमी, 2008 मध्ये जितेंद्र गोयल आणि पंकज चड्डा यांनी हॉटेलातून थेट घरी खाद्यपदार्थ पोहोचवणारी झोमॅटो ही कंपनी आणि त्यानंतर 2014 मध्ये स्थापन होऊन झोमॅटोलाही मागे टाकणारी स्विगी ही नंदन रेड्डी, श्रीहर्ष मेजस्टी आणि राहुल जेमिनी यांची कंपनी या भारतातील काही प्रचंड लोकप्रिय स्टार्टअप कंपन्या आहेत. नवउद्यमी युवकांनी बुद्धी, कौशल्याचा वापर करून आणि शंभर टक्के व्यावसायिकता जोपासून या व्यवसायात उडी घेतली आणि अद्वितीय यश मिळवून दाखवले. स्विगी सारख्या कंपनीसमोर आज हॉटेल व्यवसायिकांनीच मोठे आव्हान उभे केले आहे. आपल्या हॉटेलमार्फत घरोघर पुरवठा करून आणि स्वस्तात खाद्यपदार्थ पुरवण्याची योजना काढून अनेक हॉटेल्स स्विगीला आव्हान देत असताना स्विगी गरुडासारख्या एव्हीएशन कंपनीशी करार करून ड्रोनच्या साह्याने अन्नधान्य घरपोच करण्याची योजना यशस्वी करण्याच्या मागे लागली आहे. याशिवाय स्वतःच्या वेबसाईटवर विविध खाद्यपदार्थांची आणि हॉटेलची जाहिरात करूनही त्यांनी मोठा व्यवसाय उभा करण्याची संधी शोधली आहे. सातत्याने समोर उभ्या राहणाऱया आव्हानांवर मात करत अशा भारतीय कंपन्या आपले वेगळेपण सिद्ध करत असताना त्यांच्याबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक आहे. उच्च शिक्षण घेऊन मोठय़ा पगाराच्या नोकऱया कमावणे हे जिथे उद्दिष्ट सांगितले जात होते त्याच देशात शिक्षणाचा उपयोग करून स्वतःच उद्यमी बनण्याची जिद्द सर्वसामान्य भारतीय युवकांमध्ये निर्माण होणे ही अद्वितीय अशी घटना आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स असे परदेशी यशस्वी उद्योजक ज्या काळात नवयुवकांना प्रेरणा देत असतात त्याच काळात भारतामधील सर्वसामान्य कुटुंबातील युवक अशाच पद्धतीचे प्रेरणादायक कार्य करत पुढे येत आहेत आणि त्यांच्या कंपन्यांवर ठिकठिकाणी अभ्यास सुरू आहे. ही कौतुकाची बाब आहे. आजच्या स्थितीत जगाला सावरण्यासाठी या मंडळींचे आयुष्य प्रेरणादायी ठरले तर ते भारतासाठीही गौरवास्पद असेच ठरणार आहे.

Related Stories

प्रशंसनीय यश

Patil_p

रस्ते अपघाताचे बळी !

Patil_p

शीतयुद्धाला पूर्णविराम देणारे गोर्बाचेव्ह इतिहासजमा

Patil_p

बळीराजा आक्रमक, सरकार बचावात्मक

Patil_p

अनन्य भक्तांना वेद वचनांचे बंधन रहात नाही

Patil_p

जी-20 ः संधीचं सोनं करणार भारत

Patil_p