क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे अथर्व स्पोर्ट्स अकादमी आयोजित रघु पाटील स्मृती राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का कोरीशेट्टीने 17 वर्षाखालील मुलींच्या गटात एकेरीचे विजेतेपद तर 11 वर्षाखालील मुलांच्या गटात हर्दिन असुंडीने उपविजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत बेळगावच्या मुलींच्या विभागात 17 वर्षाखालील गटात तनिष्का कोरीशेट्टीने पहिल्या सामन्यात प्रितीका टी. व्ही. हिचा 30-12, तर दुसऱया फेरीत ऐश्वर्या टी हिचा 30-28 अशा गुणफरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तनिष्काने अभिश्री हिचा 15-7, 12-15, 15-13 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तनिष्काने श्रेया सी हिचा 21-12, 21-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने निमिषाचा 21-11, 21-13 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
11 वर्षाखालील मुलांच्या गटात एकेरीत हर्दिन असुंडी याने दुसऱया सामन्यात हर्दिनने विश्वासचा (टीएससी अकादमी) 30-18 तर दुसऱया सामन्यात हर्दिनने सात्विर बागलकोटचा 30-19, उपांत्यपूर्व फेरीत हर्दिनने चेतनकुमार हावेरी याचा 30-15 अशा गुण फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हर्दिनने यश देसाई टीएससी याचा 21-10, 21-11 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अंतिम सामन्यात अग्रनामांकित रशिक बी. के. (एनएमबीए) याने हर्दिक असुंडीचा 21-8, 21-10 असा पराभव केल्याने हर्दिनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तनिष्का व हर्दिन या दोघांना बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन तर बीडीबीएचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.