State BJP President Chandrashekhar Bawankule’s visit to Sindhudurg on November 26
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजले आहेत.या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग भागात भाजपने आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे .त्या अनुषंगाने येत्या 26 नोव्हेंबरला संपूर्ण दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा निश्चित झाला आहे .प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच श्री बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत सावंतवाडी ,कुडाळ, कणकवली, आधी तालुक्यात श्री बावनकुळे यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .सकाळी नऊ ते रात्री नऊ तब्बल 12 तास जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ हे दोन्ही भाजपचे प्रमुख नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात येत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी