मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती : स्त्राr सामर्थ्य योजना जारी करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरविण्यात येईल. 17 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पासाठी सर्व प्रकारची पूर्वतयारी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत राज्याच्या महसुलात तिप्पट वाढ झाली आहे. उर्वरित कालावधीत आणखी महसुलात भर घालण्याची सूचना देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
शनिवारी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. प्रत्येक कुटुंबाला घर चालविण्यासाठी विशेषत: महिलांसाठी विशेष कार्यक्रम जारी करण्यात येईल. स्त्राr सक्षमीकरणाबरोबरच स्त्री सामर्थ्य योजनेंतर्गत घर चालविण्यासाठी, कोविड उपचार, आरोग्य सुविधा यासाठी साहाय्य करणारी ही योजना असेल. अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाच्या गरजांचा विचार करून त्यांना किती खर्च येतो, याचा विचार करून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेला अर्थसाहाय्य करण्यात येईल. स्त्री सामर्थ्य योजनेची अंमलबजावणी करून प्रत्येक घरातील स्त्राrयांच्या नावे मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
लोककल्याण कार्यक्रमांवर भर
लोककल्याण कार्यक्रमांवर अधिक भर देता येईल अशा योजनांबाबत सरकारकडून विचार केला जात आहे. याचा लाभ कामगार वर्गाला होईल. शेतकरी, कामगार, महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्ग समुदायांना करिअर विकासासाठी कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. युव्ाा वर्गासाठी स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना, 5 लाख तऊणांना स्वयंरोजगारासाठी 1 लाख रुपये साहाय्यधन दिले जाईल. महिला सक्षमीकरण योजना या महिन्यापासून जारी होत आहे. प्रत्येक गावात दोन स्त्रीशक्ती संघांना 5 लाख ऊपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.