Tarun Bharat

स्टेट कंझ्युमर फोरम बेळगाव ऐवजी गुलबर्ग्याला

संतप्त वकीलांचा कामावर बहिष्कार : सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी

  प्रतिनिधी / बेळगाव

  स्टेट कंझ्युमर फोरम बेळगाव येथे सुरू करावे अशी मागणी वकिलांनी केली होती. मात्र बेळगाव ऐवजी गुलबर्गा येथे कंझ्युमर फोरमला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेळगाव बार असोशिएशनच्या वकिलांनी कामावर बहिष्कार घालून बायकॉर्ड केले व सरकारचा निषेध नोंदविला. 

   बेळगाव जिल्हय़ाच्या विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर फोरमची सुरूवात करावी अशी मागणी केली होती. मात्र अचानकपणे गुलबर्गा येथे नेण्याचा निर्णय घेतल्यामुळे वकील संतप्त झाले आहेत. बेळगाव बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेक्रेटरी ऍड. गिरीराज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन छेडण्यात आले आहे.

Related Stories

बायोगॅस प्रकल्प उभारणीचे काम लागणार मार्गी

Amit Kulkarni

अनगोळमध्ये खेळताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

Amit Kulkarni

राज इलेव्हन, नरवीर, डीबी स्पोर्ट्स, अल रजा विजयी

Amit Kulkarni

महांतेशनगर पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टराची नियुक्ती करण्याची मागणी

Amit Kulkarni

मराठा विकास निगमला लवकरच अनुदान

Omkar B

किरकोळ भाजीपाला बाजारात दर चढेच

Patil_p