Tarun Bharat

बायडेन यांच्याकडून मोदींसाठी ‘स्टेट डिनर’

पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर : शिकागोमध्ये भारतीय समुदायाला भेटणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन त्यांना स्टेट डिनरसाठी आमंत्रित करू शकतात. पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानंतर मोदी शिकागोमध्ये भारतीय समुदायासोबत एका मोठ्या सामुदायिक कार्यक्रमातही सहभागी होतील.

येत्या काही दिवसात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि चर्चांना गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातील प्रत्यक्ष भेटीही वाढणार आहेत. पंतप्रधान जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाणार असून त्यापूर्वी ऑस्ट्रेलियात मे महिन्यात होणाऱ्या क्वाड बैठकीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट होणार आहे. क्वाड देशांच्या या बैठकीत जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. तसेच भारत 9-10 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषद आयोजित करणार असून या बैठकीला बायडेन देखील उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांची 5 वेळा भेट घेतली आहे. त्यांची पहिली बैठक सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेत झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये व्हाईट हाऊसमध्ये सुमारे 90 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इटलीत झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि बायडेन यांची भेट झाली होती. दोन्ही नेत्यांची पुढील बैठक मे 2022 मध्ये क्वाड शिखर परिषदेदरम्यान झाली होती. त्यानंतर जून 2022 मध्ये जर्मनीमध्ये जी-7 शिखर परिषदेदरम्यान दोघांची भेट झाली. मोदी-बायडेन यांची शेवटची भेट नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशियातील बाली येथे जी-20 शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

तिसरे ‘स्टेट डिनर’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन यांचे मोदींसाठी आयोजित केलेले तिसरे स्टेट डिनर ठरणार आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासाठी डिनरचे आयोजन केले होते. आता बायडेन यांनी 26 एप्रिल रोजी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांना स्टेट डिनरसाठी आमंत्रित केले आहे. स्टेट डिनर हे अमेरिकेचे अधिकृत डिनर असून ते व्हाईट हाऊस येथे आयोजित केले जाते. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी अन्य देशाच्या सरकार प्रमुखांसाठी डिनरचे आयोजन करतात.

Related Stories

दिल्ली सरकारनं ऑक्सिजनची गरजेपेक्षा चौपट मागणी केली; सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल

Archana Banage

पंजाबमध्ये मागील 24 तासात 829 नवे कोरोना रुग्ण; 35 मृत्यू

Tousif Mujawar

अयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, राजकारण करायला नाही- आदित्य ठाकरे

Archana Banage

जैशच्या निशाण्यावर अजित डोवाल

Patil_p

2020 मध्ये ‘चंद्रयान-3’ च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

prashant_c

भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक

Patil_p