Tarun Bharat

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी / सावंतवाडी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षीच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघांची निवड केली आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने ही निवड केली. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी बुधवारी रात्री पुरस्कारांची घोषणा केली.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे दरवर्षी प्रत्येक विभागातील एका पत्रकार संघाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी कोल्हापूर विभागातून एकमेव सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची घोषणा करण्यात आली. 7 मे रोजी परभणी येथे होणाऱ्या पत्रकार अधिवेशन कार्यक्रमानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.


महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करीत असतात मात्र त्यांच्या कार्याची फारशी दखल राज्य पातळीवरून घेत नसल्याने पत्रकारामध्ये एक नकारात्मक दृष्टिकोन बळावत चालला होता. हे टाळण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका व जिल्हा संघाना दरवर्षी सन्मानित केले जाते यंदाचे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे.

सावंतवाडी पत्रकार संघाने वर्षभरात रक्तदान शिबीर, जिल्हा व तालुकास्तरीय वर्षीक पुरस्कार वितरण सोहळा, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, जिल्ह्यातील पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले या उपक्रमाची दखल घेऊन या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राष्ट्रीय पत्रकार परिषद अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे, सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, माजी पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे.परभणी येथे 7 मे रोजी होणाऱ्या पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार संघ अधिवेशनाला पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी व सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद बाबळ, सरचिटणीस संजय जोशी, कोशाध्यक्ष विजय जोशी, अनिल महाजन, जानवी पाटील यांनी केले आहे.

Related Stories

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान पूरग्रस्तांच्या मदतीला

Anuja Kudatarkar

आयकर भरणाऱयांकडूनही ‘पीएम किसान’चा लाभ

NIKHIL_N

हजारोंचा गंडा,सायबर गुन्ह्य़ातील पहिला आरोपी अटकेत

Patil_p

आंतरराष्ट्रीय कॉल प्रकरणी मोबाईल कंपनीकडून मागवला डेटा

Patil_p

सावंतवाडी नगरपरिषदेच्या घड्याळामध्ये 12 कधी वाजणार?

Anuja Kudatarkar

आचरा समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

Anuja Kudatarkar