हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी, अवघड शस्त्रक्रियेसाठी येणाऱया पशुपालकांमध्ये वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
नव्याने उभारण्यात आलेल्या महांतेशनगर येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात असल्याने उपचारासाठी येणाऱया पशुपालकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी कृत्रिम गर्भधारणा, रक्त तपासणी, एक्स-रे, सर्जरी, अवघड शस्त्रक्रियादेखील केल्या जात आहेत. त्यामुळे जनावरांबरोबर मांजर, कुत्रे, शेळय़ा-मेंढय़ा घेऊन येणाऱयांची संख्या वाढली आहे.
या ठिकाणी दररोज उपचारासाठी घेऊन येणारी कुत्री, मांजरे आणि शेळय़ा-मेंढय़ांवर तातडीने उपचार केले जात आहेत. विशेषतः एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने पशुपालकांतून समाधान व्यक्त होत आहे. या ठिकाणीच रक्त तपासणी, एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड मशीन उपलब्ध असल्याने आजाराचे निदान होणेही सोपे झाले आहे. त्यामुळे योग्य उपचार मिळत आहेत.
महांतेशनगर येथील जागेत सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. मागील महिन्यात या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, कुत्री, मांजरे, ससे, डुक्कर आदींची संख्याही अधिक आहे. या पाळीव जनावरांना आधुनिक उपचाराच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
पूर्वी पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधांअभावी पशुपालकांची गैरसोय व्हायची. दरम्यान, आधुनिक यंत्रांअभावी ऑपरेशन आणि इतर सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण अधिक होते. शिवाय एखाद्या रोगाचे निदान लागणेदेखील अशक्मय होते. मात्र आता मल्टिस्पेशालिटीमध्ये रक्त तपासणी व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने आजाराचे निदान होण्याबरोबर उपचारदेखील तातडीने मिळत आहेत.
पशुपालकांना खासगी डॉक्टरांचाच आधार
जिल्हय़ात 28 लाख जनावरे असली तरी त्या तुलनेत जनावरांच्या दवाखान्याची संख्या अगदी कमी आहे. त्यामुळे जनावरांना उपचार करताना अडचणी निर्माण होत होत्या. दर 10 हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि दवाखाना असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात 20 गावच्या कार्यक्षेत्रात केवळ एकच दवाखाना आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत अवघड उपचारासाठीदेखील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आधार ठरणार आहे.
एकाच ठिकाणी सर्व सुविधा
महांतेशनगर येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रक्त तपासणीसह अवघड शस्त्रक्रियादेखील केल्या जात आहेत. एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळत आहेत.
डॉ. एच. बी. सनकाr (मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल)