Tarun Bharat

मुरगावात होणार अत्त्याधुनिक पर्यटक क्रूझ टर्मिनल

वर्षभरात साकारणार शंभर कोटींचा प्रकल्प : आज होणार प्रकल्पाची पायाभरणी,केंद्रीयमंत्री सर्वानंद सोनवालांची उपस्थिती

प्रतिनिधी /वास्को

मुरगाव बंदरात 13.4 एकर क्षेत्रात शंभर कोटीहून अधिक खर्चाचा नवीन अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. या नवीन धक्क्याची पायाभरणी आज गुरुवारी संध्याकाळी केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनवाल यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल असून हे क्रूझ टर्मिनल भारत आणि जगासाठी गेट ऑफ गोवा ठरणार आहे. हा नवीन धक्का येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे.

मुरगाव बंदरात पर्यटक क्रूझ धक्का काही वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, याच धक्क्याच्या जोडीला नवीन अत्याधुनिक क्रूस धक्का वर्षभरात आकारास येणार आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रुझ पर्यटक सेवेसाठी क्रूझ टर्मिनल उभारण्याचे नियोजन केलेले असून केंद्र सरकारचे या प्रकल्पाला आर्थिक साहाय्य लाभलेले आहे.

‘गेट वे ऑफ गोवा’ ठरणार

सध्याच्या क्रूझ धक्क्याजवळच 13.4 एकर क्षेत्रात  हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये रो-पॅक्स व फेरी सेवा व इतर सुविधांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रुझ प्रवाशांना गोव्यातील मुरगाव बंदरात दाखल होताच जलमार्गाद्वारे इतर पर्यटन स्थळांचे दर्शन घेणे रो पॅक्स आणि फेरीसेवेमुळे सोयीस्कर आणि वैशिष्ठय़पूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी आणि जगासाठी गेट वे ऑफ गोवा ठरणार आहे. हा  प्रकल्प उभारण्यासाठी एकूण 101.72 कोटी खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पाला केंद्रीय पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या पर्यटन पायाभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत व सागरमाला योजनेअंतर्गत बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाने संयुक्तपणे निधी मंजूर केलेला आहे. टर्मिनलच्या हाताळणी आणि देखभालीसाठी 21 कोटी रूपये पीपीपी तत्वावर खाजगी गुंतवणूक होणार आहे.  पर्यटक क्रूस टर्मिनलबरोबरच मुरगांव बंदर प्राधिकरणाने सागरमाला योजनेअंतर्गत पीएसडब्ल्यू मंत्रालयाच्या आर्थिक सहकार्याने अंदाजे रू. 26.13 कोटी रूपये खर्चून स्टोरेज यार्डस् उभारण्याची तयारी चालवलेली आहे.

मालवाहतुकीसाठी उड्डाण पूल

मालवाहतूक सुलभ करण्यासाठी पोर्ट रेल्वे बायणा येथे अपरॅम्प ते उड्डाण पुल बांधण्याची मुरगाव बंदर प्राधिकरणाची योजना आहे. आयडब्ल्यूएआय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मुरगांव बंदर व गोवा सरकारच्या बंदर कप्तानच्या समन्वयाने 9.67 कोटी खर्चून मांडवी नदीवर चार तरंगत्या जेटी बांधल्या आहेत. गोव्याच्या जलपर्यटन विकासासाठी हे प्रकल्प उभारण्यात आलेले असून वर्षभरात मुरगाव बंदरातील भव्य प्रकल्पाचीही भर पडणार आहे. मुरगाव बंदरातील अत्याधुनिक क्रूझ टर्मिनलमुळे गोव्याकडे येणाऱया देशी विदेशी पर्यटक जहाजांची संख्या वाढेल. जल पर्यटनालाही गती येईल व आर्थिवृध्दी होईल अशी अशा आहे.

गोव्यात रोजगारासह अर्थव्यवस्थेला येणार बळकटाr

मुरगाव बंदरात उभारली जाणारे नवीन अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल गोव्याच्या पर्यटन विकासासाठी पोषक ठरेल असा विश्वास एमपीएचे अध्यक्ष वेंकट रामण्णा अक्काराजू यांनी म्हटले आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात 51 देशी व विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात क्रूझ पर्यटनाला भरपूर संधी असून गोव्यातही अधिक प्रमाणात क्रूझ पर्यटक येत आहेत. या पर्यटनाचा एमपीएला फारसा लाभ होणार नाही. मात्र, गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी यावी, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारच्या धोरणानुसार बंदरात क्रूझ पर्यटनाला संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे.

Related Stories

चार पालिकांसाठी पहिल्या दिवशी दहा अर्ज

Amit Kulkarni

केपे पालिकेत आणखी 6 अर्ज दाखल

Amit Kulkarni

फोंडा गट कॉग्रेस समिती बरखास्त करताना विश्वासात घेतले नाही- जॉन परेरा

Amit Kulkarni

एकाच रात्रीत 15 ट्रकांच्या बॅटऱया गायब.

Amit Kulkarni

जीवन सुंदर बनविण्यासाठी झाडे लावण्याची गरज

Amit Kulkarni

मुरगाव तालुक्यात शालेय शिक्षणाला उत्साहात प्रारंभ, विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून समाधान

Amit Kulkarni