Tarun Bharat

शिवशक्ती- भीमशक्ती युतीसाठी वंचितचा होकार

ठाकरे- आंबेडकरांची हातमिळवणी महाराष्ट्रात भाजपसाठी नवी चिंता

Shivsena- VBA : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) ने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Takrey) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत निवडणूकपूर्व युती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात “शिवशक्ती आणि भीम शक्तीची युती” ( Shivshakti- Bhimshakti ) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नव्या राजकिय बांधणीचा आगामी काळात राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकच्या (BMC) निवडणुका आणि 2024 मधील लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसह विविध निवडणुकांसाठी ही युती होत आहे. सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर करताना वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर (Rekha Thakur ) यांनी शिवसेना- वंचित युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये त्या म्हणतात, “शिवसेना आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीने तयारी दर्शवली असून पहील्या टप्प्यातील बोलणी पुर्ण झाल्या आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा भाग बनवणार आणि ही चारपक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मिळून निवडणुका लढवणार याबाबत लवकरच निर्णय होईल” असे रेखा ठाकुर म्हणाल्य़ा.

Related Stories

अडीच महिन्यात पथदर्शी प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम

Patil_p

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

Archana Banage

अजित कुऱ्हाडे दोन दिवसात कार्यभार स्वीकारणार

Patil_p

जावलीत कोरोना बाधितांचा आकडा अडिचशेच्या उंबरठय़ावर

Patil_p

डेंग्यूमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ

datta jadhav

680 कोटींचा पाणी घोटाळा महापौरांकडून चौकशीचे आदेश

datta jadhav