प्रतिनिधी /बेळगाव
पेषित महंमद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची प्रतिकृती फासावर लटकविण्यात आली होती. फोर्ट रोडवर हा प्रकार घडला होता. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असे प्रकार करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हमारा देश संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एका प्रतिकृतीला साडी नेसवून त्याला नुपूर शर्मा यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी फासावर लटकवलेल्या अवस्थेत ही प्रतिकृती आढळताच एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सर्वच हिंदू संघटनांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली व त्यांच्यावर कारवाई केली. याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे. अशाप्रकारे समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी पोलिसांनी यापुढेही कठोर पाऊल उचलावे. अशाप्रकारे महिलांचा अवमान करणे थांबविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संदीप भिडे, व्यंकटेश शिंदे, एम. बी. कोकणी, नीना काकतकर, शुभांगी झेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..