सावंतवाडी
श्री विठ्ठलादेवी मूळपुरुष वर्धापनदिन मठ येथील श्री विठ्ठलादेवी मूळपुरुष देवाचा नूतन मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी संपन्न होणार आहे. त्या दिवशी श्री देवळावर अभिषेक ,दुपारी सत्यनारायण पूजा व संध्याकाळी ठीक ७ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्थानिक व्यवस्थापक आबा मठकर व अध्यक्ष मिलिंद मठकर यांनी केले आहे.