Tarun Bharat

पोलीस असल्याची बतावणी करून ७ तोळ्याचे दागिने लांबविले

कसबा सांगाव येथील घटना

Advertisements

कागल/प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करून कसबा सांगाव ता . कागल येथील एका वृद्ध महिलेचे ७ तोळ्यांचे ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचे दागिने भामट्याने लांबविले. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती मालूताई भोपाल चौगुले ( वय ७५,रा. चावडी गल्ली कसबा सांगाव) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.

मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मालूताई भोपाल चौगुले यांच्या सोसायटी चौकातील पानपट्टीसमोर हा संशयित आला. त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करून चावरे यांच्या घरात दागिन्यांची चोरी झाल्याचे सांगितले. आपले दागिने काढून ठेवा असे सांगत चौगुले यांना विश्वासात घेतले. त्यांना अंगावरील दागिने काढून आपल्याकडे देण्यास भाग पाडले व या भामट्याने तेथून पळ काढला.

यामधे मालूताई चौगुले यांच्या १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या २० ग्रॅमच्या दोन पाटल्या. तसेच १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ३ तोळ्याची कंठीमाळ असे एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे ७ तोळ्याचे दागिने घेवून भामट्याने पोबारा केला. भर दुपारी घडलेल्या या घटनेने गावात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे करीत आहेत .

Related Stories

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापुराचा धोका टळू शकतो : पर्यावरण अभ्यासक हेमंत बहुलेकर

Abhijeet Shinde

सावर्डेतील युवकाला बाल लैंगिक अत्याचाऱ्याच्या खटल्यात सक्त मजुरी

Abhijeet Shinde

विराट कोहली भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देईल

Abhijeet Shinde

गणेशमूर्तीचे दागिने चोरणारा चोरटा ताब्यात

Abhijeet Shinde

शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

राधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!