Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पुन्हा स्टीव्ह स्मिथकडे

वृत्तसंस्था/ ऍडलेड

गुरुवारपासून येथे सुरू होणाऱया यजमान ऑस्ट्रेलिया आणि यांच्यातील दुसऱया क्रिकेट कसोटीसाठी दुखापतग्रस्त पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 164 धावांनी दणदणीत पराभव करून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऍडलेडची दुसरी कसोटी दिवस-रात्रीची खेळविली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सला स्नायू दुखापत झाली असून तो विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. आता गब्बा मैदानावर 17 डिसेंबर रोजी सुरू होणाऱया दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी कमिन्स उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. गेल्या वषी ऍडलेड येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 29 वषीय कमिन्सला कोरोना व्याधीमुळे सहभागी होता आले नव्हते. त्या सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 275 धावांनी पराभव केला होता. गुरुवारपासून सुरू होणाऱया दुसऱया आणि शेवटच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीने कर्णधार कमिन्सच्या जागी 33 वर्षीय स्कॉट बोलँडला संघात स्थान देण्यात आले आहे.

Related Stories

विस्तारवादाचे दिवस गेले, आता विकासवादाचे युग

datta jadhav

भारत फिलिपिन्सला करणार ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निर्यात

datta jadhav

नोटाबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी

datta jadhav

मागील 24 तासात देशात कोरोनाचे 41,195 नवे बाधित; 490 मृत्यू

Tousif Mujawar

काँगेस कार्यकर्ताच देशाला वाचवेल

Patil_p

झोपडीवजा घरात राहतात अहमदाबादचे महापौर

Amit Kulkarni