Tarun Bharat

मृग कोरडा… आर्द्राची उशिरा सलामी

Advertisements

पिकांना जीवदान : शेतकऱयांच्या आशा पल्लवित, अद्यापही मोठय़ा पावसाची प्रतीक्षा

प्रतिनिधी / बेळगाव

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रही कोरडे जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच गुरुवारी पावसाने सलामी दिली. मात्र म्हणावा तसा जोर नसल्यामुळे अजूनही मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱयांबरोबरच सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी दुपारपासून शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. यामुळे हवेमध्ये गारठा निर्माण झाला होता. पावसाच्या हलक्मया सरी कोसळत असल्या तरी पिकांना काही अंशी जीवदानच मिळाले आहे. मृगाप्रमाणेच हे आर्द्रा नक्षत्रही कोरडे जाणार काय? अशी काहीशी भीती बळीराजाला वाटत होती. मात्र गुरुवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी मान्सूनचे आगमन दमदार होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच पावसाने दडी मारली. केरळ किनारपट्टीवरच पाऊस घुटमळल्यामुळे कर्नाटकात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मृग नक्षत्रात पाऊस होईल, अशी आशा होती. कारण मागील दोन ते तीन वर्षांपासून मृग नक्षत्रात पावसाने हाहाकार माजविला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मृग जोरदार बरसेल अशी आशा लागून होती. मात्र यावेळी मृग कोरडा गेला आहे तर आर्द्रानेही उशिरा सलामी दिली आहे.  

गुरुवारी दुपारनंतर पावसाने बऱयापैकी हजेरी लावली. शहरासह उपनगरांमध्ये व ग्रामीण भागांतही पाऊस झाला. मात्र अजूनही काही भागात म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनाही छत्री, रेनकोट, जॅकेट घेऊनच बाहेर पडावे लागले. आता जोरदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा साऱयांनाच लागून राहिली होती. पण पुन्हा पावसाचा जोर ओसरून सूर्यकिरणे दिसू लागली.

पावसामुळे भाजी विक्रेते, फेरीवाले व इतर व्यावसायिकांना धावपळ करावी लागली. सखल भागांमध्ये आणि ठिकठिकाणी पाणी साचले होते. बरेचदिवस ओढ दिलेल्या पावसाने गुरुवारी तालुक्यात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. खरीप पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीस व उगवलेल्या पिकास हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. या पावसामुळे शेतकऱयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून अद्याप दमदार पावसाची गरज आहे.

खरीप हंगामातील भात, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या पेरणीचा हंगाम जून 15 पर्यंत तर बटाटा लागवड जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पूर्ण होतो. तालुक्यात भातपेरणी पूर्णत्वास आली आहे. पण पावसाने ओढ दिल्याने उर्वरित पेरणीची कामे ठप्प झाली आहेत. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने उर्वरित पेरणीच्या कामास सोईस्कर होणार आहे.

बेळगाव तालुक्यात विशेषतः कडोली, मण्णीकेरी, केदनूर, बंबरगा, होनगा, अगसगा, हंदिगनूर, आंबेवाडी, उचगाव, कुद्रेमनी, बेळगुंदी, बेकिनकेरे, किणये, मण्णूर, गोजगा, मच्छे, मुचंडी, हालगा, बस्तवाड आदी भागात पावसाळी हंगामाची बटाटे लागवड होते. सध्या बटाटा लागवडीच्या कामाला वेग येणार आहे. शिवाय खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकरीवर्गाची एकच धांदल सुरू आहे. बळीराजा आनंदित असून उर्वरित खरीप हंगामाला जोर येणार आहे.

28 जून ते 3 जुलैपर्यंत पावसाची शक्मयता

मृग नक्षत्राला दि. 8 जून रोजी बुधवारी दुपारी 12.37 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथे पर्जन्यमान चांगले असेल. दि. 8, 9, 16 ते 20 पर्यंत पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र पाऊस न पडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. आर्द्रा नक्षत्राला बुधवार दि. 22 जून रोजी सकाळी 11.42 वाजता सुरुवात झाली. मात्र एक दिवसानंतर आर्द्रा नक्षत्रावर पाऊस पडला आहे. दरम्यान, हा पाऊस मोठा होईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र ते फोल ठरले आहे. दि. 28 पासून ते 3 जुलैपर्यंत हा पाऊस पडण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

नगराध्यक्ष जयवंत भाटले यांचा सत्कार

Patil_p

दूषित पाण्याची समस्या तात्काळ सोडवा; अन्यथा आंदोलन

Rohan_P

शिवजयंती महामंडळातर्फे प्रधानमंत्री रिलीफ फंडाला मदत

Patil_p

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Rohan_P

ज्ञान प्रबोधन मंदिर ICSE विद्यालयाचा निकाल यावर्षी ही 100%

Rohan_P

कर्नाटक सरकार महिला कोविड योद्ध्यांना साड्या वाटप करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!