Tarun Bharat

लग्नपत्रिकेवरही स्टॉक मार्केट

सध्या देशभर लग्नसराई आहे. लग्नपत्रिका हा विवाह सोहळय़ातील एक महत्त्वाचा भाग असतो. विवाहानंतर लग्नपत्रिकेचे महत्त्व नाहीसे होते. तथापि, काही विवाहपत्रिका अशा असतात, की त्या प्रदीर्घ काळ लक्षात राहतात. त्या अनोख्या पद्धतीने तयार केलेल्या असतात. त्यांची साधनसामग्री, त्यावरील शब्द इत्यादी नाविन्यपूर्ण असतात. त्यामुळे कित्येकजण अशा पत्रिका संग्रही ठेवतात.

काही दिवसांपूर्वी हरियानातील एका कुटुंबाने स्टॉक मार्केटच्या थिमवर तयार केलेली लग्नपत्रिका चर्चेचा विषय बनली आहे. या लग्नपत्रिकेचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. या पत्रिकेत विवाहाच्या निमंत्रणाचा आशय स्टॉक मार्केटमध्ये उपयोगात येणाऱया भाषेत आहे. तसेच प्रारंभी देवाच्या नावाऐवजी राकेश झुनझुनवाला, वॉरेन बफेट आणि हर्षद मेहता यांची नावे आहेत. त्यानंतर आयपीओ असा शब्द आहे. सर्वसाधारण भाषेत त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात. पण येथे त्याचे दीर्घ रूप इन्व्हिटेशन ऑफ प्रेशियस ऑकेजन असे करण्यात आले आहे. नवरा-नवरीला एनटीटी, कुटुंबाला इन्व्हेस्टर (गुंतवणूकदार) आणि समारंभस्थळ स्टॉक एक्स्चेंज अशाप्रकारे या पत्रिकेचा आशय आहे. ही निमंत्रण पत्रिका एका डॉक्टरची असून तो महाराष्ट्रातील नांदेडचा रहिवासी आहे.

Related Stories

‘मिग-21’च्या महिला सारथींना ‘नारी शक्ती’ सन्मान

tarunbharat

राफेलसह 56 विमानांनी दाखवली ताकद

Patil_p

प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन

datta jadhav

राहुल गांधींसोबत पबमध्ये दिसणारी मुलगी कोण?

Archana Banage

केंद्रीय कर्मचाऱयांना सरकारकडून नवी भेट

Patil_p

रशियासाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक

Patil_p