सेन्सेक्स-निफ्टी वधारत बंद ः सलग चौथ्या दिवशीच्या तेजीची नोंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सलगची चौथी तेजी प्राप्त करत बाजार बंद झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 62,293.64 चा टप्पा प्राप्त करुन नवा उच्चांक गाठल्याचे दिसून आले आहे. देशातील कंपन्यांमध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो आणि मारुती सुझुकी यांच्या सारख्या कंपन्या तेजीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्समध्ये 20.96 अंकांनी वधारुन निर्देशांक 20.96 टक्क्यांसोबत 62,293.64 वर बंद झाला आहे. यामध्ये काहीवेळ सेन्सेक्स 62,447.73 अंकांचा उच्चांक प्राप्त करत बंद झाला आहे. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 28.65 अंकांनी वधारुन 18,512.75 चा नवा विक्रम नेंदवत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक म्हणजे 1.34 टक्क्यांच्या उच्चांकावर राहिले. यासोबतच विप्रो, टेक महिंद्रा , ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, टाटा स्टील आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग लाभासह बंद झाला आहे. दुसऱया बाजूला नेस्ले, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत तर चीनचा शांघाय कम्पोजिट लाभासह बंद झाला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.21 टक्क्यांच्या वाढीसोबत 86.37 प्रति डॉलर बॅरेलवर राहिला आहे.
भारतीय बाजाराने सलग चार सत्रात तेजी प्राप्त केल्यामुळे बाजारातील विविध क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात तेजीचे वातावरण राहिले आहे. मात्र सदरची ही तेजी आगामी आठवडय़ात कशी प्रवास करणार हे मात्र पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.