मैनपुरी येथील एका दहाव्या शतकात निर्माण झालेल्या मंदिराच्या संशोधनातून इतिहासतज्ञांना ऐतिहासिक अवशेषांचा साठा हाती लागला आहे. मातीच्या भांडय़ांचे तुकडे, विटांचे तुकडे व इतर अनेक पुराणकालीन वस्तू मिळालेल्या आहेत. या वस्तू पाच हजारहून अधिक वर्षे जुन्या असाव्यात, असे अनुमान आहे. यातील काही अवशेष त्यांचे वय ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले आहेत. कार्बन डेटिंगच्या साहाय्याने त्यांचे वय ओळखण्यात येणार आहे.
आता मंदिराच्या आसपासच्या भागातही उत्खनन करण्याचा पुरातत्व विभागाचा विचार आहे. मंदिराच्या खाली हजारो वर्षांपूर्वी एखादी मानवीवस्ती अस्तित्वात असावी, असा कयास आहे. मोहेंनजोदारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या प्राचीन मानवीवस्त्यांएवढीच ही वस्तीही जुनी असावी, असे काही पुरातत्वतज्ञांचे म्हणणे आहे. मंदिरांच्या भिंतीचेही नव्याने संशोधन सुरू आहे. या मंदिरातील काही पुरातन मूर्ती पुरातत्व विभागाने आपल्या अधिपत्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्रारंभी त्यांना गावकऱयांच्या नाराजीचा सामना करावा लागला. गावकऱयांनी पूजा करण्यासाठी मूर्ती परत देण्याची मागणी केली होती. तथापि, आता पुरातत्व संशोधनासंबंधी गावकऱयांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू असून त्यांचा विरोध निवळण्याची चिन्हे आहेत. या ऐतिहासिक साठय़ासंबंधीची अनुमाने खरी असल्यास भारताच्या इतिहासावर नवा प्रकाश पडण्याची शक्मयता आहे.