बेळगाव प्रतिनिधी – क्लब रोड – रेलनगर येथील रहिवासी, दिनेश बांदेकर यांच्या इमारती मधील पार्किंग मधून चार अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे केटीएम ड्यूक २५० व्हाईट कलरची बाईक चोरी केली होती . इमारतीमधील पार्किंगमधील बाईकचे लॉक तोडून ही चोरी करण्यात आली होती .
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. ही टू व्हीलर रेलनगर येथे सापडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या संबंधित गुन्हा नोंद करण्यात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

