डॉ. सुहास कलघटगी व सहकाऱ्यांकडून होणार रुग्णांची तपासणी : सोमवार 26 ते शनिवार 31 डिसेंबर अखेर आयोजन
पोटाची खळगी भरण्यासाठी आज लोक रात्रंदिवस कामात गुंतले आहेत पण हीच खळगी भरण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांमुळे पोटाचे विकारही वाढले आहेत. यातच पोटविकारामुळे अनेक जण त्रस्त असून ते उपचाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण बेळगाव शहरातील काही दिवसांतच नावारूपास आलेल्या अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने पोटविकार तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध पोटविकार शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सुहास कलघटगी व पोटविकारतज्ज्ञ डॉ. सुजित रेड्डी हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या सप्ताहाचा, पोटविकार असलेल्या रुग्णांनी लाभ घ्यावा. सदर सप्ताह सोमवार दि. 26 ते शनिवार दि. 31 डिसेंबर अखेर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार असून मोफत सल्ला व सवलतीच्या दरात (50 टक्के) रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
काही दिवसांतच नावारूपास आलेल्या अरिहंत हॉस्पिटलमार्फत विविध रुग्णांच्या तपासणीसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून पोटविकार असलेल्या रुग्णांसाठी पोटविकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामध्ये यकृताचा कर्करोग, भूक न लागणे, पोटात जळजळणे, सतत पोट दुखणे, अल्सर, हेपेटाईटीस, पोटात गोळा येणे, अपेंडिक्स, कावीळ, अल्कोहोल लिव्हर डिसिज, डायरिया यांची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, यासाठी अरिहंत हॉस्पिटल अग्रेसर राहिले असून याला रुग्णांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यामुळे पोटविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी सवलतीच्या दरात उपचार व सल्ला घ्यावा, असे आवाहनही हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
डॉ. सुहास कलगटगी हे यकृत प्रत्यारोपणासाठी प्रसिद्ध असून भविष्यात अरिहंत हॉस्पिटलमध्येही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. सुहास कलघटगी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. डॉ. सुहास कलघटगी हे अरिहंत हॉस्पिटलशी करारबद्ध झाले असून ते पोटविकार रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. यामुळे पोटविकार असलेल्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
डॉ. सुहास कलघटगी यांनी गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीमधून गोल्ड मेडल मिळविले असून त्यांनी एमबीबीएस, एमएस, डीएनबी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी शस्त्रक्रिया, लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेची पदवी मिळविली असून ते 14 वर्षांपासून रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करत आहेत. डॉ. सुहास कलघटगी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून अरिहंत हॉस्पिटलमध्ये पोटविकार रुग्णांची तपासणी व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.