पंखा अन् प्राण्यांसह मूलाला करण्यात आले दफन
फिनलंडच्या जंगलात पुरातत्व तज्ञांना एका मुलाच्या कब्रबद्दल माहिती मिळाली आहे. ही कब्र पाषाणयुगातील आहे. कब्ा्रमध्ये मिळालेल्या गोष्टी त्या काळात होणाऱया अंत्यसंस्कारांसंबंधी वेगळी आणि रंजक माहिती दर्शविणाऱया आहेत.
जंगलात एका दगडी रस्त्याखाली मुलाची ही कब्र सापडली आहे. कब्रमधून मुलाच्या दातांचे तुकडे शोधण्यात आले असून ते सुमारे 6 हजार वर्षांपूर्वीचे आहेत. मेसोलिथिक काळातील हे मूल असल्याचे समजते. दातांव्यतिरिक्त मुलाच्या शरीराचे कुठलेच अवशेष मिळालेले नाही. परंतु कब्रमधून काही प्राण्यांची फर तसेच पक्ष्यांचे पंख मिळाले आहेत. त्या काळात अंत्यसंस्कारावेळी त्यांचा वापर केला जात असण्याची शक्यता आहे.


प्लस वन नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार कब्रयुक्त जमिनीवर एक वेगळा आकार दिसून आला होता. फिनलंडची माती ऍसिडिक असल्याने मानवी अवशेष अधिक काळापर्यंत सुरक्षित राहत नाहीत. याचमुळे दफन अवशेषांविषयी अध्ययन करणे अवघड ठरते. पथकाला तेथे सांगाडा मिळण्याची कुठलीच अपेक्षा नव्हती. याचमुळे त्यांनी कब्रमधून मायक्रोपार्टिकल्सचा शोध घेतला.
तेथे मिळालेल्या दातांच्या तपासणीतून मृत एक मूल होते आणि त्याचे वय 10.5 वर्षांपेक्षा कमी होते असे समजले. दातांचे रेडिओकार्बन डेटिंग करणे शक्य नव्हते. याचमुळे दफन करण्यात आलेल्या दगडी कलाकृतींच्या आधारावर कब्ा्रच्या वयोमानाचा शोध घेण्यात आला. दोन क्वार्ट्जचे मिळालेले तीर हे मेसोलिथिक काळातील भौतिक संस्कृतीच्या अनुरुप होते अशी माहिती संशोधनाच्या लेखिका क्रिस्टिना मनेरमा यांनी दिली आहे.
श्वानाचे केस
संशोधकांना त्याठिकाणी श्वानासारख्या प्राण्याचे तीन केसही मिळाले आहेत. मजूनसुओचा शोध खरोखरच महत्त्वाचा आहे. मृतांसोबत दफन श्वानही आढळून आले आहेत. याचे उदाहरण स्केटहोममध्ये दिसून येते. स्केटहोम हे दक्षिण स्वीनडमध्ये 7 हजार वर्षे जुनी एक प्रसिद्ध अंत्यभूमी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.