उदय सावंत / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील निसर्गाच्या सान्नध्यातील अनेक घटकांचा वापर करून आपल्या कलेला वाट मोकळी करून देण्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये मोर्ले सत्तरी येथील रामकृष्ण गावस यांची भर पडली आहे. त्यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून वैशिष्टपूर्ण स्टोन पेंटिंगद्वारे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पणजी येथील काकूलो मॉल या ठिकाणी सदर पेंटिंग प्रदर्शन व विक्री सुरू झाली असून याला चांगली मागणी असल्याचे माहिती उपलब्ध झालेली आहे. याबाबत रामकृष्ण गावस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका नैसर्गिक साधन संपत्तीत श्रीमंत आहे. या घटकांचा वापर आतापर्यंत अनेक जणांनी वेगवेगळय़ा माध्यमातून केलेला आहे. सूर्यकांत गावकऱ यांनी चिरेखाणीच्या दगडावर वैशिष्टपूर्ण कोरीव कामगिरी करून विशिष्ट अशी परंपरा समोर आलेली आहे. तर लाडू परवार यांनी अशाच प्रकारे कलाकृतीच्या माध्यमातून आपली विशिष्ट अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे. राजेंद्र केरकर यांनी लेखनाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील पारंपारिक, ऐतिहासिक अशा वैशिष्टय़पूर्ण स्थळांना प्रकाशमय करण्याचे काम केले आहे.
सध्या मोर्ले येथे रामकृष्ण गावस यांनी स्टोन पेंटिंग च्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील नद्यांमध्ये मिळणारे दगड यावर सुंदर पेंटिंग करून विशेष अशी कला सर्वासमोर आणलेली आहे.
पारंपरिक लोककलाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आतापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या व गोव्याच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये पारंपरिक कला संवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये महिला भगिनींना पारंपारिक भजन, घुमट वादन ,समई नृत्य अशा विविध कलांचे शिक्षण घेऊन त्यांना या कला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
मात्र स्टॉन पेंटिंग च्या माध्यमातून त्यांनी विशिष्ट अशी कला समोर आणलेली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की जन्मजात आपण कधी चित्र काढले नाही. अचानकपणे
3 मे 2022 रोजी दगडावर पेंटीग करण्याचे विचार आला व त्यानंतर या नव्या प्रवासाला सुरुवात झाली.
3 मे 2022 हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस. या दिवसाच्या माध्यमातून आपल्या कलाकारी जीवनाच्या माध्यमातून एक आनंददायी जीवन प्रवासाला वाट मोकळी करून देण्याचा चांगला संधी लाभली व यामुळे आतापर्यंत आपण दगडावर वेगवेगळय़ा प्रकारचे पेंटिंग्स करून अनेकांकडून प्रशंसेसाठी पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी सत्तरी तालुक्मयातील नद्यामध्ये मिळणाऱया गुळगुळीत दगड वापरण्यात आलेले आहेत. त्यांची पेंटिंग्स पाहिल्यास एक जिवंत कला साकारण्याची त्यांच्या हातामध्ये असलेली जादू प्रत्येकासाठी नेत्रसुख देणारी निश्चितच आहे.
सध्या त्यांनी पणजी येथील काकूलो मॉल याठिकाणी प्रदर्शनासाठी स्टोन पेंटिंग ठेवले असून आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ही पेंटिंग्स विकत घेतली आहे. तर अनेकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे .उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मामू हागे यांनी विशेष प्रदर्शनाला भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कलाकारी वाटचालीला आपल्या शुभेच्छा दिले आहेत.
निसर्गामध्ये असलेले अनेक घटक आपल्या कलाकारी जीवनाला सुखद व योग्य मार्ग मोकळा करून देऊ शकतात हे रामकृष्ण गावस यांनी आपल्या स्टोन पेंटिंग च्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे.
सदर पेंटिंग सध्यातरी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असून त्याची विक्रीही करण्यात येत असल्याचे यावेळी रामकृष्ण गावस यांनी स्पष्ट केले.